News Flash

मुख्यमंत्री पदावरुन भांडणाऱ्या शिवसेना-भाजपाला शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते

(PTI)

राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असून समंजसपणा दाखवून त्यांनी सरकार स्थापन करावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवारांनी यांनी पुन्हा एकदा आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचं सांगितलं.

यावेळी शरद पवारांनी बोलताना सांगितलं की, “महाराष्ट्रात जी परिस्थीती निर्माण झाली आहे ती दुरुस्त होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या राज्यात सरकारच नाही असं होऊ नये”. रामदास आठवले यांनी भेटीत या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय सल्ला देऊ शकाल असी भूमिका मांडली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

“भाजपा, शिवसेना आणि त्यांच्या मित्रपक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यांनी सरकार स्थापन करत महाराष्ट्रात स्थिरता येईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी रामदास आठवले यांनी अधिक प्रयत्न करावे असा सल्ला मी दिला आहे. रामदास आठवले यांचं राजकीय पक्षांमध्ये वेगळं स्थान आहे. त्यांनी काही म्हणणं मांडलं तर इतर पक्ष गांभीर्याने दखल घेत असतात,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

कर्नाटकसारखी परिस्थिती निर्माण होईल की नाही हे सांगू शकत नाही. पण समंजसपणा दाखवून सरकार स्थापन करावं असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसंच आम्ही फक्त सल्ला देऊ, कोणतीही मध्यस्थी करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी राज्यपालांनी बहुमत असणाऱ्या पक्षाला बोलवायला हवं होतं. राज्यपाल भाजपाला का बोलवत नाही हे माहित नाही असंही म्हटलं.

दरम्यान रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना शरद पवार आणि आपले गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध असल्याचं सांगितलं. “भाजपा आणि शिवसेनेत एकमत होत नाही आहे. अडचणीच्या काळात काय करावं याचा सल्ला घेण्यासाठी मी शरद पवारांकडे आलो होतो. शिवसेना भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे. आपण दोघांशी चर्चा केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं,” असल्याची माहिती रामदास आठले यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 3:33 pm

Web Title: ncp sharad pawar bjp devendra fadanvis shivsena uddhav thackeray maharashtra government sgy 87
Next Stories
1 आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावे द्यावेत – मुनगंटीवार
2 नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यस्थेलाच जिवंत जाळलं – जयंत पाटील
3 कुत्र्याला घराबाहेर काढलं, मुलीने आईविरोधात नोंदवली पोलीस तक्रार
Just Now!
X