महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता यावी यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचं समजतं आहे. शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा द्यावा म्हणून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांना फोन केल्याचं समजतं आहे. आता सोनिया गांधी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेसमधला एक गट शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मिळत असलेली सत्ता हाती घ्यावी या मताचा आहे. तर एक गट शिवसेनेशी मुळीच हात मिळवणी करु नये असा विचार करणारा आहे. सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेस आमदारांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांची मतं जाणून घेतली. सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं लक्ष आहे.

भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थतता दाखवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलावलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र काँग्रेसने पाठिंबा दिल्याशिवाय बहुमताचा आकडा जाणार नाही. त्यामुळे सोनिया गांधी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.