|| संतोष जाधव

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणा सज्ज

बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ७१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. १३९ ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ८३० मतदान केंद्रांवर मतदान होईल.

बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांची वाढ ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन पोलीस आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभागी यंत्रणांनी सज्जता बाळगल्याची माहिती बेलापूर मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. ऐरोली मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी म्हणून अभय करगुटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन्ही मतदारसंघांतील मतदान केंद्रे तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या तयारीची पाहणी केली आहे. मतदान काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे.

बेलापूर मतदारसंघ

२०१९ चे मतदार : ०३,८५ ,८८२

मतदान ठिकाणे : ५७

एकूण मतदान केंद्रे : ३९०

संवेदनशील मतदान केंद्रे : ३५

निवडणूक कर्मचारी : २०००

ऐरोली मतदारसंघ

२०१९ चे एकूण मतदार : ४,०१,३४९

मतदान ठिकाणे : ८२

एकूण मतदान केंद्रे : ४४०

संवेदनशील मतदान केंद्रे : ३६

निवडणूक आयोग व बेलापूर व ऐरोली येथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सुरक्षेबाबत योग्य ती तयारी करण्यात आली असून आवश्यक ते पोलीस विभागाचे सहकार्य देण्यात येत आहे. – पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ- १