|| नीलेश अडसूळ

रॅपगीते, लघुपटांद्वारे जनजागृती : – तरुणांमधील मतदानाबाबतची उदासीनता घालविण्यासाठी तरुणच तरुणांना रॅप संगीत, लघुपट आदी मार्गानी साद घालत आहेत. तरुण याकरिता समाजमाध्यमांबरोबरच तंत्रज्ञानाचाही उत्तम वापर करत आहेत. तर काहींनी रॅप, लघुपट, मिम्स, डिजिटल पोस्टर अशा मनोरंजनात्मक माध्यमांतूनही तरुणांना मतदानासाठी आवाहन केले आहे.

भारतात ६५ टक्क्यांहून अधिक तरुण मतदार असले तरी मतदानाबाबत तरुण वर्ग काहीसा उदासीन दिसतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत निवडणुकीच्या काळात विविध सामाजिक संस्थांकडून किं वा काही तरुण मंडळींकडून ‘चला करू मतदान’ या आशयाची पथनाटय़ सादर केली जायची. अगदी रस्त्यारस्त्यांवर, चौकात, नाक्यांवर असे पथनाटय़ सर्रास पाहायला मिळायचे, परंतु आता या पथनाटय़ांची जागा समाजमाध्यमे, लघुपट, रॅप अशा विविध पर्यायांनी व्यापली आहे.

वरळीच्या चैतन्य प्रभू या २१ वर्षीय तरुणाने ‘मेक युअर प्रेझेन्स’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. त्या अंतर्गत नवमतदारांना मतदान ओळखपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. याशिवाय आपला स्थानिक प्रतिनिधी निवडताना काय निकष लावावे, आपल्या विभागातील उमदेवार कोण, त्याचे शिक्षण काय, संपत्ती काय, कोणत्या कामासाठी कोणत्या लोकप्रतिनिधींकडे जावे या सगळ्याबाबत मार्गदर्शन केले जाते. या कामासाठी त्याला निवडणूक आयोगाकडूनही सहकार्य मिळाले आहे. आपल्या मित्रांच्या सहकार्याने सुरू के लेल्या या मोहिमेत आतापर्यंत १० हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी झाली आहे.

भांडुप येथील सिद्धेश दळवी २९ वर्षीय तरुणाने ‘आधारयुथ’ संस्थेच्या माध्यमातून मतदान जागरूकता अभियान सुरू के ले आहे. त्याने समाजमाध्यमांचा आणि जनसंपर्काचा वापर केला आहे. आपला उमेदवार कोण, विभागात मतदान केंद्र कु ठे आहे, कोणत्या यादीत नाव आहे, मतदान करताना काय काळजी घ्यावी, मतदार ओळखपत्र कसे काढावे याची सविस्तर माहिती मराठीत लिहून समाजमाध्यमाद्वारे तो पोहचवत आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मित्रांसोबत वैयक्तिक  पातळीवर तरुणांना मतदानासाठी आवाहनही करतो. मतदान के ल्यावर शाई लावलेल्या बोटासोबत ‘सेल्फी’ काढून आधारयुथच्या माध्यमातून सर्वत्र पोहचविला जातो. ‘लोकांपर्यंत अचूक माहिती पोचवण्यासाठी आम्हालाही पूर्वतयारी करावी लागते. लोक समाजमाध्यमांवरून शंका विचारतात. आम्ही निरसन करतो,’ असे सिद्धार्थ सांगतो.

अशाच पद्धतीचे काम नाहूर येथील ओनील कुलकर्णी या तरुणानेही सुरू के ले आहे. पूर्वी पथनाटय़ाच्या माध्यमातून तो मतदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवत होता. परंतु काळानुसार पथनाटय़ाला मिळणारा प्रतिसाद बदलल्याने त्यानेही समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे.

रॅप, मिम, लघुपटचा आधार

अनेक तरुणांनी रॅप संगीताच्या माध्यमातून आपले विचार पोहचवले आहेत. यामध्ये राजकीय घडामोडींपासून ते मतदान करणे का गरजेचे आहे इथपर्यंत सर्व आशय मांडला गेला आहे. विशेष म्हणजे हिंदी-इंग्रजी सोबत मराठी रॅपही लोकप्रिय होत आहेत. मराठी रॅप करणारा रोहन राव म्हणजे रॅपर एमसी अस्तित्व सांगतो, मतदानाविषयी रॅप लिहिण्याआधी अनेक १८ वर्षीय तरुणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मतदानाबाबत असलेला त्यांचा अजाणतेपणा, निवडणुकांविषयी असलेली अनभिज्ञता लक्षात

घेऊ न हा रॅप लिहिला गेला. ‘सरकार बदलायची ताकद तरुणांच्या मतांमध्ये आहे, आणि त्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे. अशा आशयाचे रॅप निर्माण करण्यात आले आहे. रॅपप्रमाणेच अनेक लघुपट यू टय़ूबच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहचवले

जात आहेत. अशाच एका लघुपटात दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने भूमिका साकारली होती. बदलत्या माध्यमांविषयी शुभांगी सांगते, आजकाल सगळ्या बऱ्या-वाईट गोष्टींचा उहापोह समाजमाध्यमांवर घेतला जातो. लघुपट, गाणी, मिम्स ते अगदी विडंबन गीतांचाही वापर होतो. ही माध्यमे सहज उपलब्ध होत असल्याने अशा माध्यमांतून मतदारांपर्यंत आशय पोहचवणे प्राभावी ठरत आहे .