सांगलीत ‘पदवीधर’साठी २९ टक्के तर ‘शिक्षक’साठी ६२ टक्के मतदान

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज सांगली जिल्ह्यात झालेल्या मतदानामध्ये ४२ हजार ३८४ पदवीधर मतदारांनी तर ६ हजार २०६ शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज सांगली जिल्ह्यात झालेल्या मतदानामध्ये ४२ हजार ३८४ पदवीधर मतदारांनी तर ६ हजार २०६ शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघासाठी  २९.८२ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी ६१.९६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यात १ लाख ४२ हजार १२३ मतदार होते. त्यापकी ४२ हजार ३८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३३ हजार ७७ पुरुष मतदार आणि ९ हजार ३०७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यात १० हजार १६ मतदार होते. त्यापकी ६ हजार २०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४ हजार ७८८ पुरुष मतदार आणि १ हजार १८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 29 for graduate and 62 for teacher voting in sangli