जालना लोकसभा मतदारसंघात १ हजार ८४२ मतदान केंद्रे असून, यातील ५२ केंद्रे संवेदनशील आहेत. सर्वाधिक १४ संवेदनशील केंद्रे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आहेत. जालना १०, बदनापूर ९, भोकरदन ५, फुलंब्री ५, पैठण ९ याप्रमाणे अन्य विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील केंद्रे आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची संख्या- जालना २९७, बदनापूर ३३७, भोकरदन ३००, सिल्लोड २९०, फुलंब्री ३१२ व पैठण ३०५. याशिवाय १० सहकारी मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. लोकसभा मतदारसंघात ५ एप्रिलला असणारी अंतिम मतदारसंख्या १६ लाख ९ हजार ३४८ असून, ८ लाख ६४ हजार ८१४ पुरुष व ७ लाख ४४ हजार ५३४ स्त्री मतदार आहेत. २ हजार ७०६ सैनिक मतदार आहेत. मतदारसंघात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे ४० गुन्हे नोंदविण्यात आले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर परवानाधारकांकडील विविध ४७१ शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून विविध बँकांच्या आर्थिक उलाढालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ४२ लाख व १० लाख रुपयांची रक्कम दोन वाहनांमधून ताब्यात घेण्यात आली. या संदर्भात चौकशी केली जात आहे. ‘सोशल मीडिया’वरही लक्ष ठेवले जात आहे. उमेदवारांना दैनंदिन खर्चाचा हिशेब लिहिण्यास निवडणूक विभागाने पुस्तिका दिल्या आहेत. निवडणूक विभाग मतदार माहितीपत्रिका (पोलचिट्स) वाटप करणार आहे. मतदानाच्या किमान ५ दिवस आधी पोलचिट्सचे वाटप करण्यात येईल. जालना शहरातील पूर्वीच्या ८ मतदान केंद्रांत इमारतीच्या दुरवस्थेमुळे बदल करण्यात आला. मतदानासाठी केंद्रप्रमुखांसह ७ हजार ४८४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पाचशेपेक्षा अधिक वाहने लागणार आहेत. या मतदारसंघात ३४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पैकी ७जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत.

What percentage of voting was done in Baramati Constituency till three o clock
बारामती मतदारसंघात तीन वाजेपर्यंत किती टक्के झाले मतदान?
Rural voters are more vigilant than urban ones with an average voter turnout of 60 percent
अकोला : शहराच्या तुलनेत ग्रामीण मतदार अधिक सजग, सरासरी ६० टक्के मतदान; उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
Nagpur, BJP MLA sister, deprived of voting,
नागपूर : भाजप आमदाराच्या भगिनीचेच नाव मतदार यादीतून वगळले
Bhiwandi Lok Sabha Constituency, election 2024, Maha Vikas Aghadi, mahayuti, Suresh mhatre alias Balya Mama
भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका