येत्या ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दोन पदवीधर तर दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, १५ मे रोजी या चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Ambadas Danave
मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Devendra Fadnavis
‘भाजपासाठी महाराष्ट्र अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आव्हान आहेच…”
Praful Patel on Uddhav Thackeray
प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”

हेही वाचा – मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!

अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १० मे रोजी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १३ जून रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोटनिस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.