रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांची मागणी वित्त व नियोजनमंत्री यांच्याकडून मान्य
रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्राचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती.
वित्त व नियोजनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा वार्षकि योजना २०१६-१७ (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी अधिकारी उपस्थित होते. या बठकीत वायकर यांनी विविध गोष्टींची मागणी केली.
यात जिल्ह्यामध्ये १०५९ साकव असून सद्य:स्थितीत ५९७ साकव नादुरुस्त आहेत. त्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याने आवश्यक निधी देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. त्यानुसार नादुरुस्त तसेच प्रस्तावित साकवांची पाहणी करून निधी देण्यात येईल, असे आश्वासन वित्त व नियोजनमंत्री यांनी पालकमंत्र्यांना दिले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माई रमाबाई आंबेडकर यांच्या दापोली, वणंद या जन्मस्थानाच्या विकासासाठी सुमारे २ कोटी रुपये ही मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही वित्तमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे समुद्रकिनारा विकसित करण्यासाठी नऊ कोटी रुपयांच्या विकास आराखडय़ास तत्त्वता मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी थिबा पॅलेस ते भाटय़े बीच रोप वे, परशुराम ते गोवळकोट किल्ला रोप-वे, शासकीय रोपवाटिकांची अत्याधुनिक नर्सरी, शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी बियाणे, अवजारे, कीटकनाशके, स्टार शौचालये, आदी विविध मागण्याही पालकमंत्री वायकर यांनी केल्या आहेत.

Delhi Police issues notice to Telangana Chief Minister Revanth Reddy for tampering with Home Minister Amit Shah footage
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी पाचारण; गृहमंत्री अमित शहा यांच्या चित्रफितीत फेरफार केल्याचा आरोप
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
What will those do as MPs who cannot run factory says Ajit Pawar
ज्यांना कारखाना चालवता येत नाही ते खासदार होऊन काय करणार- अजित पवार