मागील तीस वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करीत असल्याने राजकीय मंडळाशी चांगले संबंध आहे. मात्र कधी राजकारणात जाणार नसून त्यापासून लांब राहणार असल्याची भूमिका पानी फाऊंडेशनचे संयोजक आणि सिनेअभिनेता आमिर खान यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. राजकारणात असल्यावरच सामाजिक क्षेत्रात काम करता येते असे नसून त्याच्या बाहेर राहून देखील चांगले काम करता येते. असे त्यांनी सांगितले.

तुम्हाला चांगल्या कामाच्या जोरावर राज्यसभेवर जाणार का या प्रश्नावर अमीर खान यांनी भूमिका मांडली.यावेळी अमीर खान म्हणाले की,महाराष्ट्रामध्ये पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून काम शेवटच्या घटकापर्यँत पोहचवणार आहे.त्यासाठी प्रत्येक घटकाला सामावून घेणार आहे.हे सर्व घटक एकत्र आल्यास लवकरच महाराष्ट्र पाणीदार होईल.त्याचबरोबर पानी फाऊंडेशन पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमुळे टीम एक वर्षांसाठी ब्रेक होण्याच्या तयारीत होती.मात्र तसे आम्ही करणार नसून अधिक चांगले काम करणाऱ्यावर भर देणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

जलसंधारणासाठी महाराष्ट्राची निवड करण्या मागील कारणे या प्रश्नावर ते म्हणाले की,देशातील इतर राज्यात जलसंधारणाचे काम चांगले असून त्यात मी महाराष्ट्रीयन असल्याने आपल्या राज्यात जलसंधारणाचे काम करण्याचे ठरवले.आज या कामाला तीन वर्षपूर्ण झाले आहे.त्या कामावर समाधानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.तर या कामामध्ये आधिकधिक तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.