मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; चौघांचा मृत्यू , आठ जखमी!

प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूने धडकले

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर चिल्हार फाट्याजवळ अवाणढणी गावाजवळ आज झालेल्या भीषण अपघातात दांडी येथील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईकडून दांडी येथे परतताना प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूने धडक दिल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

एकवीरा मातेचे दर्शन घेऊन हे कुटुंब पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतत असताना हा अपघात घडला. वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती अतिगंभीर आहे तर सहा जण जखमी आहेत.

अपघातातील मृतामध्ये १) हेमंत तरे (वय -६०), २) सुषमा आरेकर (वय -३२), ३) चालक राकेश तमोरे (वय-४२), ४) सर्वज्ञा आरेकर (वय-०२) या चौघांचा समावेश आहे. तर, तृप्ती तामोरे (वय ३५), रमेश आरेकर (वय ५४) हे यांची प्रकृती गंभीर आहे.

याशिवाय, 1) हर्षद तरे (वय २७), 2) भव्या आरेकर (वय ४), 3) महेश आरेकर (वय ३९), 4)सुनील तामोरे (वय ४०) 5)आकाश पाटील (वय २५), 6) जयेश तामोरे वय (०३) हे सहाजण जखमी झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accident on mumbai ahmedabad national highway three killed five injured msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या