ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेवरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. काही विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच, या टीकेला फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले, या घटनेला काही लोक राजकीय रंग देत आहेत, ते योग्य नाही. ही घटना गंभीर असली तरी घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा यांचे एकत्रित बॅनर काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाले होते. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र काम करत होते. पण अचानक त्यांच्यात इतका बेबनाव का झाला? मॉरिसने अभिषेक घोसाळकरला गोळ्या का घातल्या? आणि त्यानंतर त्याने आत्महत्या का केली? याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
“फेसबूक लाइव्हमध्ये बोलताना त्याच्या मनात…”, घोसाळकर हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “अचानक त्याने…”
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काल झालेली घटना (घोसाळकर यांची हत्या) ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशी घटना कुठेही घडू नयेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-02-2024 at 12:24 IST
TOPICSअजित पवारAjit Pawarक्राईम न्यूजCrime Newsदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमुंबई न्यूजMumbai News
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says police investigation going on abhishek ghosalkar murder case asc