जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवारी चौदावा दिवस होता. सोमवारी जरांगे यांनी तपासणी करण्यास आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला.  यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट आरक्षण देण्यात यावे, ही आपली मागणी आहे.  राज्य सरकार मराठवाडय़ातील आरक्षणाच्या संदर्भात ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे  आहेत त्यांना आरक्षण देणार असेल तर पश्चिम महाराष्ट्राने तुमचे घोडे मारले आहे काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उपस्थित केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

त्यासंदर्भात विचारले  असता जरांगे म्हणाले, मी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण द्या म्हणतो, मग महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र येत नाहीत का? जरांगे यांच्याशी संवाद करण्यास आम्ही कमी पडत असल्याच्या आशयाचे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता जरांगे म्हणाले की, ते सत्तेमध्ये आहेत. मराठा समाजाची वेदना हीच माझी वेदना आहे. मागील ७५ वर्षे मराठा समाजाने राजकीय पक्षांना भरभरून दिले. आता त्यांची वेळ आहे आम्हाला न्याय देण्याची. ओबीसींवर अन्याय करू नका. परंतु आम्हालाही न्याय द्या.

हेही वाचा >>> पंकजा यांच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये फडणवीस समर्थकच आघाडीवर

 शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी जरांगे यांची भेट घेतली. वर्षांनुवर्षे राज्यातील शेती तोटय़ात गेलेली आहे. जास्त शेती मराठा समाजाकडे असल्याने दुष्काळाची अधिक झळ मराठा समाजास बसलेली आहे. ही लढाई महाराष्ट्राची आहे आणि सरकारला पाझर फुटला पाहिजे, असे राजू शेट्टी यावेळी  म्हणाले.

‘पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजावर अन्याय का?’

सांगली : मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील मागणीनुसार जर मराठवाडय़ातील मराठा समाजाला आरक्षण दिले तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठय़ांवर अन्याय कशासाठी ? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी मराठवाडय़ातील मराठय़ांचे निजामकालीन कागदपत्रांमध्ये कुणबी असे उल्लेख असून, त्याचा शोध घेत जरांगे यांच्या आंदोलनाने मराठवाडय़ातील मराठे विरुद्ध राज्यातील अन्य असा जाती अंतर्गत लढा सुरू झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antarwali sarati village maratha reservation manoj jarange refusal of treatment ysh
First published on: 12-09-2023 at 00:14 IST