अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी दोषारोपपत्रासह भलताच बनावट आरोपी उभा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायाधीश व्ही. के. जाधव आणि न्यायाधीश एस. सी. मोरे यांनी औरंगाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर रोडवरील ढोरेगाव येथील राधिका पेट्रोलपंपासमोर १८ फेबुवारी २०२१ रोजी सकाळी एका कारने मोटार सायकलस्वार बाबासाहेब बोराडे यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब यांचे भाऊ पुंजाराम यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीआधारे अमरजित बावीस्कर याच्याविरुध्द गुन्हाही दाखल झाला. पण, न्यायालयात मात्र रिक्षाचालक रवि सोनीराम काकडे याच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

Nagpur rape, rape mentally challenged marathi news
नियतीचा न्याय! ‘त्या’ बलात्काऱ्याला न्यायालयातून शिक्षा मिळण्यापूर्वीच…
Kolhapur, Bidri Sugar Factory, Bidri Sugar Factory s president, k p patil , Court Ordered, Audit, Kolhapur news, marathi news
के. पी. पाटील यांनी आव्हान स्वीकारले; बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षण आदेशाचे स्वागतच
bombay hc refuses to entertain pil seeking fir against celebrities for tobacco gutka ads
तंबाखू आणि गुटख्यांच्या जाहिरातींविरोधातील याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी, उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर याचिका मागे
ISIS, five ISIS terrorists, Special court Delhi,
पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा
Nitesh Rane, High Court, Nitesh Rane latest news,
वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी
kirit love jihad case
मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या, किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
man arrested from gujrat after 12 years in wife assulting case
पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक

हे दोषारोपपत्र लक्षात घेऊन पुंजाराम बोराडे यांनी अॅड्. रवींद्र गोरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. अमरजित हा पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. अपघाताच्या वेळी त्याचा कारचा विमाही काढलेला नव्हता. त्याला नुकसान भरपाईपासून आणि गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी बनावट आरोपी उभा केला आहे. गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा दाखल करणे गरजेचे असताना तो दाखल केलेला नाही. बनावट आरोपी उभा करताना दाखवलेली रिक्षा भंगारमधील आहे. रवि काकडे याचा गंगापूरचा पत्ता दाखवला असला तरी तो तेथे राहात नाही.

पंचनाम्यात अमरजित याची कार आणि बाबासाहेब याची मोटारसायकल यांच्यात अपघात झाल्याचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. अमरजितच्या कारचे बंपर फुटलेले व त्याला रक्त लागलेले असल्याचे सिध्द करणारा साक्षीदार उपलब्ध आहे. अशा युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी अॅड्. गोरे यांना अॅड्. चंद्रकांत बोडखे, अॅड्. स्वप्नील मुळे व अॅड्. पल्लवी वांगीकर सहकार्य करत आहेत.