मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवर टीका करताना भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी ‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.’ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. त्यापाठोपाठ आता महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीनेदेखील बोंडेंवर पलटवार केला आहे. प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले, अनिल बोंडेंसारख्या माणसाने असं बोलणं चुकीचं आहे, त्यांनी किमान आपली लायकी पाहून तरी बोललं पाहिजे.

बच्चू कडू म्हणाले, आपण कोणामुळे कुठे आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बेडूक हत्ती होऊ शकत नाही, अशा प्रकारची वक्तव्ये करू नये. अक्कल नसल्यासारखं बोलणं सध्या सुरू आहे. बोंडेंना केंद्रात अडचणी येत असतील म्हणून इकडे काहीतरी बोलण्याचा प्रकार सुरू आहे. एकत्र असून मुख्यमंत्री साहेबांना अशा पद्धतीने बोलत असतील तर ते चुकीचं आहे.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Manoj Jarange patil,
“उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात…”, मनोज जरांगे यांचे आवाहन; म्हणाले, “मराठा समाजात…”
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी

मुख्यमंत्र्यांचा प्रभाव सध्या वाढतोय. त्यांच्या प्रसिद्धीवर, त्यांच्या चांगूलपणावर अशा पद्धतीने वक्तव्ये केली जात असतील तर ते चुकीचं आहे. भाजपा अशा पद्धतीने एखाद्या पक्षाला सोबत घेऊन हळूहळू कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाही ना? असा प्रश्न बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियेतलेला कुठेतरी ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय. परंतु हे लोकांना समजलं तर लोक फार विचार करून पुढे येतील.

हे ही वाचा >> २१ व्या वर्षी ४५ लाखांच्या पॅकेजची नोकरी, राजस्थानची तान्या सिंह जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत कशी पोहोचली?

आमदार बच्चू कडू म्हणाले, बोंडे जे काही बोलतायत, हे म्हणजे आपल्याच माणसाला असं बोलायचं, त्यांच्या लोकप्रियतेला अशा पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करणं योग्य नाही. देवेंद्रजींची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि शिंदेंची वेगळी आहे.