भिवंडी-वाडा महामार्गावर खुपरी गावाजवळ ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एका सायकलचालकाचा मृत्यू झाला. मधुकर पाटील (४६) असे या सायकलचालकाचे नाव आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या जमावाने ट्रकला पेटवले.येथील भिवंडी-वाडा महामार्गावरून मधुकर पाटील जात होते. यावेळी मागून वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळला. यानंतर ट्रकचालकाने पलायन केले. दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत कोणीच ट्रक घेण्यास आले नाही. यामुळे संतप्त जमावाने ट्रकला पेटवून दिले. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2013 रोजी प्रकाशित
सायकलस्वाराचा अपघाती मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला
भिवंडी-वाडा महामार्गावर खुपरी गावाजवळ ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एका सायकलचालकाचा मृत्यू झाला. मधुकर पाटील (४६) असे या सायकलचालकाचे नाव आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या जमावाने ट्रकला पेटवले.
First published on: 02-02-2013 at 03:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bicycle riderer dead in accident