scorecardresearch

Premium

“…अन्यथा २०१९ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते”, सुनील तटकरेंचं मोठं विधान

“२०१९ साली शपथविधीनंतर अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं, पण…”, असंही तटकरेंनी सांगितलं.

sunil tatkare
कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबीरात सुनील तटकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ( छायाचित्र – महाएनसीपी स्पिक्स 'एक्स' अकाउंट )

२०१७ साली मला आणि अजित पवार यांना सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. पण, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. काही कारणास्तव ते सरकार स्थापन झालं नाही. नाहीतर २०१७ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते, असं विधान अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंनी केलं आहे. ते कर्जतमधील अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.

सुनील तटकरे म्हणाले, “२०१७ साली मला आणि अजित पवारांना सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. परंतु, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. सात-आठ महिने चर्चा झाल्या, लोकसभेच्या जागा, खाती, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदेही ठरली होती. पण, काही कारणास्तव ते सरकार बनलं नाही. नाहीतर २०१७ साली भाजपा आणि राष्ट्रवादीचं स्थापन झालं असते.”

Congress government in Telangana
तेलंगणात काँग्रेसचे ‘मिशन लोकसभा’, लोकांना आकर्षित करण्यासाठी योजनांचा पाऊस!
bjp national convention marathi news, bjp national convention bharatmandapam marathi news
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात विकासनामा-रामनामाचा गजर
Mallikarjun Kharge black paper PM Narendra Modi
काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात काळी पत्रिका जाहीर; पंतप्रधान मोदी म्हणाले, “बरं झालं…”
Rohit Pawar
“…तरी पक्षाचा बाप आमच्याबरोबर आहे!”, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : “७० हजार कोटींवरून अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं, कारण…”, सुनील तटकरेंचं विधान

“घड्याळ तेच, वेळ नवी”

“सरकार स्थापन झालं नाही, म्हणून कर्जतमध्येच पक्षाचं शिबीर पार पडले होते आणि तिथून नवीन दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आता, त्याच कर्जतमध्ये आपलं शिबीर आहे. ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या विचारांनी आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे,” असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.

हेही वाचा : “भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना ‘नालायक’ नाही म्हणायचे, तर…”, ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“२०१९ साली जयंत पाटलांसह अन्य आमदारांच्या सह्यांचं निवेदन”

“२०१९ साली पहाटेचा नाहीतर सकाळी ८ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. पण, तेव्हा अजित पवारांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं निवेदन तयार करण्यात आलं होतं. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ठाण्यातील आमदाराचींही सही होती,” असे म्हणत सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp and ncp govt 2017 but i and ajit pawar dont support say sunil tatkare in karjat ssa

First published on: 30-11-2023 at 15:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×