भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नामंजूर केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर गणेश नाईक पुन्हा एकदा समोर आले आहेत. बुधवारी त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन नवी मुंबईतील अडचणींविषयी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील आरोपांवर भाष्य केलं.

“माझ्यावर दाखल झालेले गुन्हे हे हे विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे. याबाबत आपण लवकरच सविस्तर बोलणार असून दूध का दूध आणि पानी का पानी करणार आहेत,” असं गणेश नाईक म्हणाले आहेत.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Pooja tadas and ramdas tadas
सासऱ्याविरोधात सून! कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केलेल्या पूजा तडस निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाने दिली संधी
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा ; फसवणुकीची महिलेची तक्रार, महिला आयोगाकडूनही दखल

“गेल्या २५ वर्षात ज्यांना राजकारणात, समाजकरणात उद्धिष्ट साध्य करता आले नाही त्यांनी अन्यायकारक पद्धतीने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. हायकोर्टाने मला दिलासा दिला आहे. मोकळीक देताना कोर्टाने काही बंधनं घातली आहेत. त्यामुळे गरज लागेल त्या स्तरावर योग्य पद्धतीने मी समोर जाणार आहे. हे प्रकरण संपल्यानंतर मनातील गोष्टी सांगण्यासाठी सर्वांशी संवाद साधणार आहे,”

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर जास्त भाष्य करुन नये असं कोर्टाने सांगितलं आहे. काही दिवसात सर्व सत्य समोर येईल आणि दूध का दूध, पानी का पानी होईल असंही ते म्हणाले,