भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि वाद हे समीकरण जुळलं आहे. अलीकडेच गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ असं संबोधलं होतं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून अजित पवार गट आणि गोपीचंद पडळकर यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. अशातच गोपीचंद पडळकर यांचं नवीन गाणं आलं आहे. यात पडळकर तुफान डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपीचंद पडळकर यांच्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच, हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. ‘आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका’, असं गाण्याचं नाव आहे. याच गाण्यावर गोपीचंद पडळकर थिरकले आहेत.

साजन बेंद्रे यांनी ‘आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका’ हे गाणं गायलं आहे. यापूर्वीही साजन बेंद्रे यांची अनेक गाणी सुप्रसिद्ध झाली आहे. त्यात ‘आमच्या गाडीला बीरेक न्हाय बरका’ या गाण्यानं भर घातली आहे.

हेही वाचा : “…तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही व्यक्तीगत टीका झाली”, अजित पवार गटातील नेत्याचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त विधान काय?

“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं होतं.

चंद्रशेखर बावनकुळे यांची माफी

पडळकरांच्या विधानावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांची माफी मागितली आहे. “भाजपा विरोधात असो की सत्तेत कोणत्याही नेत्याबद्दल असंस्कारी शब्द कधीही मान्य केले नाही. यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल विधान केले होते. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समज दिली.”

हेही वाचा :

“कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही”

“सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करणार्‍या व्यक्तीला एक प्रतिष्ठा आहे. कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे आम्ही सत्तेत असो की विरोधात असो, आम्ही सत्तेचा उन्माद करणार नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यावेळीदेखील स्पष्ट भूमिका होती आणि आताही आहे. कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे अजित पवार यांचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो,” असं बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padlkar dance on songs aamchya gadila birek nahi barka sajan bendra video viral ssa
First published on: 22-09-2023 at 18:08 IST