शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘म्याव म्याव’ प्रकरणावरुन ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. नितेश राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आपले वडील नारायण राणेंची सुपारी दिल्याचा आरोप करण्याबरोबरच आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवरुनही ‘म्याव म्याव’चा उल्लेख करत टीका केली आहे. तसेच आदित्य यांचा आक्रमकपणावर आपण आपल्या भाषेत उत्तर देऊ असंही नितेश यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी…”; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया

“म्याव म्याव आवाज महाराष्ट्रभरात…”
आज नितेश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना महाराष्ट्रभरातून म्याव म्याव असा आवाज येतोय असा खोचक टोला लगावला. “महाराष्ट्रात दौरे काढले जातायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहचतोय. म्हणून मी एवढं सांगितलं की हे म्याव म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्ही सुद्धा दाखवू, त्यासाठीच मी मुद्दाम असे ट्वीट केले आहेत. या माध्यमातून जो एकंदरीत आव आणला जातोय त्याबद्दल मला बोलायचं आहे.” असा इशारा नितेश यांनी शिवसेनेला दिलाय.

नक्की वाचा >> “…पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला…”; उद्धव ठाकरेंवरुन नितेश राणेंचा आदित्य यांना सवाल

नक्की वाचा >> ‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…”

पत्रकारांच्या प्रश्नावरुन टोला
बंडखोर आमदार गद्दार असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे आक्रमकपणे शिवसंवाद यात्रेदरम्यान टीका करत आहेत, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना, “तुमचा आक्रमकपणा काय आहे हे जरा नितेश राणेला सांगा मग मी त्याची उत्तरं माझ्या भाषेत देईल,” असं नितेश म्हणाले. तसेच पुढे बोलताना नितेश यांनी आदित्य यांचा एकेरी उल्लेख करत, “नुसतं म्याव म्याव केलं तर त्याची एवढी फा*ली, पूर्ण उभा राहिलो असतो तर काय उरलं असतं याच्याबद्दल विचार करा,” असं विधान केलं.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”

म्याव म्याव प्रकरण काय?
डिसेंबर महिन्यामध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनाच्यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.