भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी या ठिकाणी भाषण करताना एक मोठं वक्तव्य केलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो. खासदर करुन तुम्हीच दूर लोटलं असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळणार नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशात आता त्यांनी शिर्डीतल्या सभेत हे वक्तव्य केलं आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी जवळ असलेल्या राहाता शहरात महिला बचत गटाला साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपांना मी दोन महिन्यांनी उत्तरं देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे. शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे (शिर्डी) येईन. काळजी करू नका”, असं वक्तव्य केल्याने सुजय विखेंना नेमकं म्हणायचं काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp sujay vikhe patil big statement about himself in shirdi speech scj
First published on: 03-03-2024 at 08:04 IST