भाजपच्या ‘बंद’दरम्यान अमरावतीत हिंसाचार

शहराच्या पश्चिमेकडील नमुना, सराफा बाजार, सक्करसाथ या भागांत दोन गट समारोसमोर आल्याने काही काळ बिकट स्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांसह नऊ जखमी; संचारबंदी 

अमरावती : शहरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक, जाळपोळ झाल्याने तणाव निर्माण झाला असून बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजपने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी के लेल्या दगडफे कीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.

शहराच्या पश्चिमेकडील नमुना, सराफा बाजार, सक्करसाथ या भागांत दोन गट समारोसमोर आल्याने काही काळ बिकट स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

त्रिपुरा येथील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी काही समाजकंटकांनी दुकानांवर दगडफे क के ली. तसेच काहींना मारहाण के ली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागांतून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने राजकमल चौकात जमले होते. तेथे कार्यकत्र्यांनी प्रचंड घोषणाबाजी के ली. काही वेळानंतर भाजपचे आंदोलक कार्यकर्ते ऑटोगल्ली, अंबापेठ परिसरांत शिरले. घोषणाबाजी करीत त्यांनी बंद दुकानांवर दगडफे क के ली. अंबापेठ येथील एका रुग्णालयावरही दगडफेक करण्यात आली. आंदोलक नमुना गल्ली परिसरात शिरल्यानंतर त्यांना दुसऱ्या गटाकडून प्रतिकार करण्यात आला. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी या परिसरात काही दुकाने, टपऱ्या पेटवून दिल्या. वाहनांना आग लावली. 

दुसरीकडे, इतवारा बाजार परिसरात मोठा जमाव एकत्र आला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू के ली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर के ला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमारही के ला. या भागातही दोन गट एकमेकांसमोर आले होते; पण पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली. याच काळात मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्याने गल्ल्या-गल्ल्यांमधून लोक बाहेर यायला लागले. शहरातील पश्चिमेकडील भागात तीव्र संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. दंगलखोरांनी नमुना, अंबापेठ, राजकमल चौक, सराफा बाजार, धान्य बाजार, सक्करसाथ, हर्षराज कॉलनी, हमालपुरा या भागांत दगडफेक के ली. दगडफेकीत पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरती सिंग सुटीवर,  पाटील यांना जबाबदारी

अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग सुटीवर असल्याने गडचिरोली नक्षलवाद पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांना तातडीने अमरावतीत पाठवण्यात आले. ते तत्काळ अमरावतीत दाखल झाले असून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

सामाजिक सलोख्याचे आवाहन… हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी शहरात बेमुदत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात कोणीही वैद्यकीय कारण वगळता इतर कारणांसाठी घराबाहेर पडू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. वेळप्रसंगी इंटरनेट सेवा बंद केली जाऊ शकते, असे संके त देण्यात आले आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकू र यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दंगलीची जबाबदारी राज्य सरकारचीच -फडणवीस

मुंबई : त्रिपुरात न घडलेल्या घटनांवर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी व चिथावणी देणारी वक्तव्ये करीत असतील, तर या दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली व सर्वांना शांततेचे आवाहन केले. त्रिपुरा सरकार आणि तेथील पोलिसांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण निव्वळ अफवेवर मोर्चे काढण्यात आले. जाळपोळ करण्यात आली आणि हिंदूंची दुकाने जाळली गेली. अमरावतीतील घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. हा एका सुनियोजित षड्यंत्राचा भाग वाटतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.   रझा अकादमीच्या विरोधात कारवाई करावी व बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी, अशी मागणी  भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

महाराष्ट्र अशांत करण्याचा भाजपचा कट -पटोले

मुंबई : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागांत वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली पेटवून फायदा घेण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला.  जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पटोले यांनी केले आहे. अमरावतीसह काही भागांत घडलेल्या हिंसक घटनांचा निषेध करून  पटोले म्हणाले की, सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही.  देशभर  मोदी सरकारविरोधात असंतोष आहे.  विधानसभा निवडणुकांमध्ये फटका बसू नये व जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपकडून हे षड्यंत्र आखले गेल्याचा आरोप पटोलेंनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp violence in amravati during the shutdown nine injured including police curfew akp

ताज्या बातम्या