लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई होणार आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर सुप्रिया सुळे उभ्या राहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजेच घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. ही लढत निश्चित मानली जाते आहे. या प्रकरणी आता शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

जुलै २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज नेते असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात उभी फूट पडली. कारण २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवारांनी सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पक्षावरही दावा सांगितला. निवडणूक आयोगाने शिवसेनेप्रमाणेच निकाल देत पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत.अशात लोकसभेच्या रणसंग्रामात बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. या प्रकरणी आता सरोज पाटील यांनी भाजपावर आरोप केला आहे.

rahul gandhi to visit sangli
Rahul Gandhi Sangli Visit : राहुल गांधी ५ रोजी सांगली दौऱ्यावर; पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Nagpur university professor sonu jeswani
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप
Amit Gorkhe, Parth Pawar ,
पिंपरी-चिंचवड: पार्थ पवारांनी महायुतीविरोधात वक्तव्ये करणं टाळावं – भाजपा आमदार अमित गोरखे
Parth Pawar, Shrirang Barne,
पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..
What Anil Deshmukh Said About Devendra Fadnavis ?
Anil Deshmukh : “देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात डील झाली आणि…”, अनिल देशमुखांचा आरोप
Bachchu Kadu Vs Ravi Rana
Bachchu Kadu Vs Ravi Rana : बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वादाचा दुसरा अंक; चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच दोघांमध्ये खडाजंगी!
What Susma Andhare Said About Sachin Waze
Sushma Andhare : “सचिन वाझेचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सांगण्यावरुन…”; सुषमा अंधारेंचा आरोप

काय म्हणाल्या आहेत सरोज पाटील?

“मी कुटुंबातलीच सदस्य आहे, मी हे तुम्हाला सांगते, भाजपाला सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे आणि सुनेत्राला निवडून आणायचं आहे. त्यामुळे शरद पवारांचा पराभव होईल असं त्यांना (भाजपा) वाटतं. पण बारामतीत शरद पवारांनी केलेलं काम, लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अजितने काम केलं आहे, अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातला. पहिल्यांदा शरद आमदार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण घरी आले होते आणि म्हणाले होते शरद ही मतं तुझी नाहीत, ही मतं तुझ्या आई वडिलांची आहेत. तुझ्या आई वडिलांनी सामाजिक पाया घातला आहे. त्यामुळे तू तुझी मतं मिळव. शरदने प्रचंड काम केलं आहे, त्यामुळे तो पडणार नाही.”

हे पण वाचा- Ajit Pawar:“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”, सख्खे बंधू श्रीनिवास पवार अजित पवारांविरोधात आक्रमक

सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ आहेत पण…

“सुनेत्रा आणि सुप्रिया दोघीही निर्मळ, सोज्वळ आहे. या दोघींना परस्परविरोधात लढवलं जातं आहे हे दुर्दैव आहे. पण दोघींचा स्वभाव चांगला आहे. पण सुप्रियाचा अभ्यास प्रचंड आहे. सुप्रिया सोन्याचा चमचा जरी तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी.. पण एक इंग्रजी शब्दही तिच्या तोंडी नाही. सुप्रियाने प्रयत्न करुन तिची मराठी भाषा सुधरवली. तिच्यात खूप कणखरपणा आला आहे. तिला मुळीच गर्व नाही. तिच्यामध्ये आणि सुनेत्रात महत्त्वाचा फरक म्हणजे सुप्रिया संसदरत्न आहे. विरोधी पक्षाने तिला हे दिलं आहे. तडफदार भाषणं करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तिची भाषणं मोदीही ऐकत असतात. ती फिरते, गरीबांना मदत करते, शिक्षणसंस्थेत ती काम करते. तेवढा अभ्यास सुनेत्राचा नाही” असं सरोज पाटील यांनी म्हटलं आहे.