scorecardresearch

Premium

बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? दिल्लीत एकनाथ शिंदे म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्हावर दावा कुणाचा यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar Eknath Shinde Ajit Pawar
बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळलं. या घटनेचे पडसाद एवढ्यावरच थांबले नाही, तर पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावरून मोठा वाद झाला आणि निवडणूक आयोगाने पक्ष व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आणि बंडखोर अजित पवार गट पक्ष व पक्षचिन्हावर दावा करत निवडणूक आयोगात गेला. आज त्या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाला मिळेल, अशी विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीत बोलत होते.

धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आजपासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. आयोग योग्य तो निर्णय घेईन. लोकशाहीत ज्या बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईन.”

Narayan Rane Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर राणे-भुजबळांचा आक्षेप, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारने घेतलेला निर्णय…”
indi Alliance
“इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
ajit pawar marathi news, ajit pawar rohit pawar, rohit pawar ed notice marathi news,
“आम्ही त्याचा इव्हेंट करत नाही, माझी ५ तास चौकशी झाली…”, रोहित पवारांच्या ईडी नोटीशीवर अजित पवार म्हणाले…
Sanjay Raut Nana Patole Prakash Ambedkar
‘इंडिया’ आघाडीत प्रकाश आंबडेकरांना घेण्याबाबत एकमत; मविआचे खुले पत्र

“…म्हणून गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली”

एकनाथ शिंदे म्हणाले, “गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं आहे.”

“मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत”

https://x.com/mieknathshinde/status/1710162455698227254

हेही वाचा : VIDEO: मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण जखमी

“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांचा या आगीत मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेन, असाही निर्णय घेण्यात आला आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde over election commission hearing on ncp party symbol claim pbs

First published on: 06-10-2023 at 13:43 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×