आवळगाव (ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) येथील शेतशिवारात एका १७ वर्षीय मुलीचे हात मागे बांधून बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे रविवारी मध्यरात्री उघडकीस आले.
आवळगाव येथील राजेंद्र दुमाने यांची शेती गावापासून दोन-अडीच किलोमीटरवर आहे. त्यांच्या शेतातील धान कापणीला आला होता. परंतु ते व त्यांची पत्नी हिंगणघाट येथे सोयाबीन कापणीसाठी रोजंदारीने गेले होते. त्यामुळे घरी मुलगी, लहान भाऊ व आजी असे तिघेच होते. आईवडीलांनी मुलीला एखादी रोजंदारी बाई मजूर घेऊन धान कापून घेण्यास सांगितले होते. हे धान कापणीचे काम करण्यासाठी मुलीने रोजंदारी मजूराचा शोध घेतला, परंतु बाईमजूर न मिळाल्याने ती रविवारी दुपारी शेतावर एकटीच गेली. तेव्हा अज्ञात आरोपीने तिचे हात मागे बांधून बलात्कार करून तिचा खून केला. सायंकाळ झाली तरी तील घरी परत आली नाही म्हणून आजीने गावातील काही लोकांसोबत शेताच्या दिशेने धाव घेतली. यावेळी शेतात तिचा मृतदेह पडून होता. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी मेंडकी पोलीस ठाण्याला दिली. ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक ओ. पी. अंबाडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पासे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. रात्री उशिरा मृतदेह ब्रह्मपुरी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रूग्णालयात बीएएमएस महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने आणि हे प्रकरण बलात्काराचे असल्यामुळे मृतदेह सोमवारी उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. सांयकाळी उशिरा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली. दरम्यान, मुलीच्या घरून एक मोबाइल तसेच घटनास्थळी काही साहित्य सापडल्याची माहिती आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या