Covid -19 : राज्यात दिवसभरात ३ हजार ५९५ नवीन करोनाबाधित; ४५ रूग्णांचा मृत्यू

राज्यात आज ३ हजार २४० रूग्ण बरे देखील झाले आहेत.

corona maharashtra Update
राज्यात आज रोजी एकूण ४९,३४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात आज पुन्हा एकदा दिवसभरात करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त आढळून आली. मात्र या दोन्ही संख्येत फार मोठा फरक नसला, तरी देखील अद्यापही करोनाबाधित वाढत आहेत हे यावरून दिसून येते. शिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ५९५ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार २४० रूग्ण बरे झाले आहेत. तर, ४५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२०,३१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०६ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,११,५२५ झाली आहे. तर आजपर्यंत १३८३२२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

मुंबईत उद्या लसीकरणासाठी ‘महिला राखीव दिवस’! महानगरपालिका राबवणार विशेष सत्र

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६५,२९,८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,११,५२५ (११.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज रोजी एकूण ४९,३४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 3 thousand 595 new corona patients in a day in the state death of 45 patients msr