कणकवली येथील दर्पण सांस्कृतिक मंच या संस्थेच्या वतीने येथील साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांना ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रा. अहिरे यांना शाल, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यास शिक्षण महर्षी प्रा. आर. एल. तांबे, चित्रकार नामानंद मोडक, विद्रोही कवी धुरंदर मिठबावकर आणि साहित्यिक उत्तम पवार उपस्थित होते. प्रा. आहिरे यांचे वैचारिक लेखन व त्रमासिक ‘परिवर्तन’च्या उत्कृष्ट संपादन कौशल्याबद्दल पुरस्कार निवड समितीने यावर्षीच्या सन्मानासाठी त्यांची निवड केली. या वेळी कवी काशिनाथ वेलदोडे, भाऊसाहेब अहिरे, जयंत बोढारे यांची विशेष उपस्थिती होती.