२३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी गेल्या १५ ते २० दिवसांपासून चर्चेत आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना कल्पना होती. त्यांना कल्पना देऊनच सगळ्या गोष्टी झाल्या होत्या असं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी फडणवीस हे सभ्य राजकारणी आहेत असं वाटलं होतं मात्र याबाबत ते असत्याचा आधार घेत आहेत असंही म्हटलं होतं. मात्र आज शरद पवार यांनी असं म्हटलं आहे की पहाटेच्या शपथविधीचा एकच फायदा झाला की राष्ट्रपती राजवट राज्यातून उठली. त्यांनी हे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आणखी एक आव्हान दिलं आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे की पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली त्यांना मी एकच विचारू इच्छितो त्यांनीच हे स्पष्ट करावं की महाराष्ट्रात त्यावेळी राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या मागणीवरून राष्ट्रपती राजवट लागली? राष्ट्रपती राजवट लावण्यापाठीमागे कोण होतं? याचा खुलासा शरद पवारांनीच करावा म्हणजे तुम्हाला सुरूवातीपासून कडी जुळवता येईल. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांना नवं आव्हान दिलं आहे. आता यावरून शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
Pune Lok Sabha, Ravindra Dhangekar,
पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
wardha lok sabha seat, Sushma Andhare, BJP MP Ramdas Tadas Family, Injustice Towards Daughter in law, Pooja Tadas, Demands Justice, pm narendra modi, modi Wardha Meeting, bjp,
पंतप्रधान मोदी साहेब पीडित पूजा तडस तुमचा परिवारात नाही का? सुषमा अंधारे म्हणाल्या…

२३ नोव्हेंबर २०१९ ला नेमकं काय घडलं होतं?

२३ नोव्हेंबर २०१९ ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता. आज मात्र त्यांनी या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार म्हणाले आहेत.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काय म्हटलं आहे?

दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितलं आहे.