मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अलीकडेच बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके याचं घर जाळलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजलगावसह बीड जिल्ह्यात घडलेल्या जाळपोळीच्या घटना हे एक मोठं षडयंत्र होतं, असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बीडमधील हिंसाचाराच्या घटनांवर भाष्य करताना धनंजय मुंडे म्हणाले, “काही समाजकंटकांनी बीड जिल्हा पेटवण्याचा प्रयत्न केला, असा प्रयत्न यापूर्वी कधीही झाला नव्हता. एवढा भयानक प्रकार ३१ तारखेला बीड जिल्ह्यात घडला. यापूर्वी देशात आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली. पण अशा आरक्षणाच्या आंदोलनात कुणाच्या घरावर किंवा व्यवसाय करण्याच्या ठिकाणांवर अशाप्रकारे हल्ले झाले नाहीत. पण बीड जिल्ह्यात त्या दिवशी लोकप्रतिनिधिंची घरं जाळण्यापासून त्यांची व्यावसायाची ठिकाणं जाळण्यापर्यंत जे काही प्रकार घडले, त्याचा मी जाहीर निषेध करतो.”

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश

हेही वाचा- शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

“हे सर्वकाही अचानकपणे घडलं आहे. माजलगावसह बीड जिल्ह्यातील बऱ्याच घटना पाहता, यामध्ये फार मोठं षडयंत्र दिसून येत आहे. ज्यापद्धतीने एका ऑडिओ क्लिपचा अनर्थ काढून संबंध मराठा समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं काम केलं. माजलगावमध्ये काहीतरी होणार हे पोलिसांना कळेपर्यंत तिथले लोकप्रतिनिधी प्रकाश सोळंके यांच्या घरावर जाळपोळ आणि त्यांना जीवे मारण्यापर्यंत प्रयत्न झाला. विशेष म्हणजे प्रकाश सोळंके स्वत: मराठा समाजाचे आहेत, तरीही त्यांच्या घरावर हल्ला झाला,” असंही धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.

हेही वाचा- VIDEO: मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर पेटवलं, वाहनं जाळली

पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाले, “बीडमध्येही एक-एक व्यक्ती, त्यांची घरं, त्यांचा व्यवसाय, तो कुठल्या समाजाचा आहे, हे बघून हल्ले करण्यात आले आहेत. यामागे फार मोठं षडयंत्र आहे. आतापर्यंतच्या माझ्या माहितीनुसार, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. माजलगावच्या घटनेत जवळपास २५० ते ३०० जणांची ओळख पटली आहे. तर बीडच्या इतर घटनेतही बऱ्याच लोकांची ओळख पटली आहे.”