कोयना धरण ८१ टक्के धरण भरले असून, धरणात ८० .७६ टीएमसी उपयुक्त जलसाठा आहे.आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे १ फूट ९ इंच उचलून सांडव्या वरून १० हजार ४१० क्युसेक पाणी सोडण्यात आले.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी ८ वाजेपर्यंत कोयना येथे १३६ नवजा येथे ८२ व महाबळेश्वर येथे १५६मिमी पावसाची नोंद झाली आहे.कोयना धरणाच्या सांडव्या वरून ९ हजार ३६० क्युसेक व धरण पायथा विजगृहमधून १ हजार ५० क्युसेक असा एकूण १० हजार ४१० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Nighoje bandhara Leakage Leads to Water Shortage in Pimpri
पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त जलसाठा टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे-

धोम – ८.३९ (७१.७९ टक्के), धोम-बलकवडी- ३.५८ (९०.३९ टक्के), कण्हेर – ८.४५ (८८.०५ टक्के), उरमोडी – ९.१६(९४.८७ टक्के), तारळी- ४.८५ (८६.०३ टक्के), निरा-देवघर – ७.८० (६६.५५ टक्के), भाटघर-१८.६७ (७९.४३ टक्के), वीर – ९.२९ (९८.८१ टक्के)

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे ९०टक्के भरलेली आहेत. तसेच हवामान खात्याने पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रमुख धरणातून कोयना उरमोडी ,तारळी, कण्हेर, वीर,धोम बलकवडी यामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि तो वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच, नदीपात्रात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नये अथवा पोहण्यासाठी जाऊ नये, पुलावरून आठ्वसओढ्यावरून पाणी वाहत असेल तर पूल ओलांडू नये, घाटातून प्रवास टाळावा व दरड प्रवण क्षेत्रात जाऊ नये, सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे, जनावरांना नदी नाल्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे असे अवाहन जिल्हा नियंत्रण केंद्र सातारा यांनी केले आहे.

कोयना धरण परिसरात ३.१ रिस्टर स्केलचा भूकंप –

कोयना धरण परिसरात आज (शनिवार) सकाळी १०.२२ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची पातळी ३.१ रिस्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावाच्या ईशान्येस १० किमी अंतरावर ८ किमी खोलीवर होता .कोयना धरणापासून याचे अंतर  १३.६० किमी आहे.या भूकंपाच्या धक्क्याने कोणत्याही नुकसानीची नोंद नाही.