महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी नगरसेवकांचा रोष ओढवून घेतलेले आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्याविरूध्द बुधवारी महासभेत मांडण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला. एकूण ७० नगरसेवकांच्या सभागृहात ४९ जणांनी अविश्वासाच्या बाजुने हात उंचावून मतदान केले. शिवसेना-भाजपचे १३ सदस्य तटस्थ, तर सात जण गरहजर राहिले. महिन्यापासून महापालिकेत आयुक्त विरुध्द नगरसेवक यांच्यात विविध कारणांवरून वाद सुरू होता. पालिकेतील विविध सभांना आयुक्त डॉ. भोसले यांची अनुपस्थिती नगरसेवकांना खटकत होती. विशेष म्हणजे केवळ सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी नगरसेवकांशीही त्यांचे जमले नाही. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीन आयुक्तांवर अविश्वास ठराव मांडण्याचे ठरविल्यावर त्यास सर्वपक्षीयांची साथ मिळाली. बुधवारी ठरावावर मतदान घेतल्यानंतर महापौर जयश्री अहिरराव यांनी आयुक्तांवर नगरसेवकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, हेकेखोरपणा, शहराला सतत वेठीस धरणे, कामकाजात गरवर्तणूक करणे, नगरसेवकांना बदनाम करणे, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न न करणे, पालिकेचे आíथक नुकसान करणे, भोगवटय़ाच्या नावाखाली नगरसेवकांना वेठीस धरणे अशी अविश्वासाची कारणे असल्याचे सांगितले.