राज्यातील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 

file photo

करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ४ ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले होते. आता हे वर्ग पुन्हा बंद राहतील.

राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध धार्मिक सण आणि उत्सवांकरीता सुट्ट्या जाहीर करण्यात येत असतात. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 

सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले वर्ग बंद राहतील. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali holidays announced for students in the state srk

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या