scorecardresearch

Premium

औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या

मिरवणूक संपल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्‍या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जुन्या वादातून ही हत्‍या झाली असल्‍याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर दोन्‍ही आरोपी फरार आहेत.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्‍यान एका तरूणाची भोसकून हत्‍या करण्‍यात आल्याची बाब उघड झाली आहे. शहरातील क्रांती चौक भागात ही खळबळजनक घटना घडली. मिरवणूक संपल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्‍या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जुन्या वादातून ही हत्‍या झाली असल्‍याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर दोन्‍ही आरोपी फरार आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आशिष साळवे असे मृत तरूणाचे नाव आहे. तो रमानगर भागातील रहिवाशी आहे. सहा महिन्यांपुर्वी एका लग्‍नाच्‍या वरातीत मयत आशिष आणि संशयीत आरोपी अविनाश जाधव व कुनाल जाधव यांचे भांडण झाले होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी आशिषला १४ एप्रिल रोजी गुप्‍तीने भोकसले. यात आशिष गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घाटी रुग्‍णालयात दाखल केले मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्‍ही संशयीत आरोपी फरार झाले आहेत. क्राती चौक पोलिसात गुन्‍हा नोंदवण्‍याची प्रक्रिया सुरू होती.

pune, wall of old wada, collapsed, budhwar peth, Firefighters, Save, 2 persons,lives,
पुणे : बुधवार पेठेत जुन्या वाड्याची भिंत कोसळली; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे दोघांचे प्राण वाचले
kolhapur, two murder in kolhapur, kolhapur crime news,
कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या
How much donation did Ram Mandir receive
रामलल्लाचा दररोज नवनवा विक्रम, ११ दिवसांत २५ लाख भाविक दर्शनासाठी पोहोचले; ‘इतके’ कोटी मिळाले दान
738 crore turnover from onions in four months in Solapur
सोलापुरात चार महिन्यात कांद्यातून ७३८ कोटींची उलाढाल; दर घसरणीमुळे ३०० कोटींचा फटका

Latest Comment
View All Comments
Post Comment

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: During the ambedkar jayanti rally in aurangabad a young man killed

First published on: 15-04-2018 at 09:18 IST

आजचा ई-पेपर : छत्रपती संभाजीनगर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×