राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पहाटे सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने छापेमारी केली आहे. पुणे आणि कागल येथील घरांवर ईडीने छापा टाकला आहे. छापेमारीचं वृत्त समोर येताच हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली असून ईडीविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी ईडीकडून ही कारवाई केली जात आहे.

ईडीच्या छापेमारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफ यांच्यावर झालेले आरोप राजकीयरित्या प्रेरित असल्याचं तपासे यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
Ashok Chavan, kanhan, Nana Patole,
नाना पटोले हे शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर बोलू शकत नाही, अशोक चव्हाण यांची टीका; म्हणाले, “स्वप्नांवर पाणी टाकले…”
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’

हेही वाचा- Hasan Mushrif ED Raid: सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

छापेमारी प्रकरणावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, “हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपाच्या काही नेत्यांनी खोटे आरोप केले. त्यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई झाली. वास्तविक साखर कारखान्यात घोटाळा झाला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. पण त्यामध्ये काहीही तथ्य नाही. सर्व आरोप हे राजकीयरित्या प्रेरित आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला अडचणीत आणण्याचा कट-कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. ज्या पद्धतीने अनिल देशमुख आणि संजय राऊतांवर खोटे आरोप झाले, त्याप्रकारचे आरोप हसन मुश्रीफ यांच्यावरही करण्यात येत आहेत. परंतु, न्यायदेवतेकडून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल अशी आमची धारणा आहे,” असं तपासे म्हणाले.