सोलापूर : सांगोला तालुक्यातील महूद येथे एका टायरच्या दुकानवजा गोदामात अचानकपणे स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत एका तरूणाचा मृत्यू झाला, तर अन्य दुसरा भाजून गंभीर जखमी झाला. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा… “

painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..
Father death Ranjan Pada Alibag Taluka
रायगड : रागाच्या भरात मुलाने केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू, अलिबाग तालुक्यातील रांजण पाडा येथील घटना

हेही वाचा – बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका

अतुल बाड असे या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. पहाटे टायरचे दुकान तथा गोदाम बंद असताना अचानकपणे तेथे स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरात होता की त्यात दुकानाचे शटर पन्नास फूट दूर जाऊन पडले. खिडक्याही निखळून दूर अंतरावर पडल्या. दुकानाच्या समोरील भिंती कोसळल्या. मृत अतुल बाड व अन्य सहकारी हे दोघे दुकानात झोपले होते. जखमीला पंढरपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाचे निश्चित कारण समजू शकले नाही. सांगोला पोलीस पुढील तपास करीत आहेत.