लातूर : उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव कारने दिलेल्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला. मृत व जखमी नांदेडमधील रहिवासी असून ते तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. ही घटना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लातूर महामार्गावरील आष्टामोड ते महाळंगरा पाटीदरम्यान घडली आहे.

हेही वाचा >>> “..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६), मोनू बालाजी कोतवाल (२७), नरमन राजाराम कात्रे (३३) व कृष्णा यादव (सर्व रा. नांदेड) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर शुभम किशोर लंकाढाई हा गंभीर जखमी झाला आहे. नांदेड येथील पाच तरुण कारमधून लातूर मार्गे तुळजापूरला जात होते. अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर तिघांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे अन्य दोघेजण मरण पावले.