मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही टीकाही सहन करावी लागली. बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. यावरून राज्याचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सरकारवर ताशेरे ओढले होते. दीड वर्ष महाराष्ट्र गद्दार गँगच्या भूलथापा ऐकतोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

“बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री. ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशीलता? खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गँगच्या भूलथापा ऐकून घेतो आहे. या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय! असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ व्हिडीओवर आदित्य ठाकरेंची टीका, “दीड वर्ष महाराष्ट्र गद्दार गँगच्या भूलथापा…”

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”
अजित पवार – “हो……येस’

देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.”

मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे.

भाजपाकडून काय प्रत्युत्तर?

आजोबांची पूर्ण हयात ज्यांचा विरोध करण्यात गेली, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी महाराष्ट्राला विचार दिला, त्यांच्या विचारांशी गद्दारी केली, तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचाराचे नाही राहू शकला, त्यामुळे महाराष्ट्राच्या विचाराचं सोडा. महाराष्ट्रातला एकही नागरिक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव आहे. शिंदे फडणवीस साहेबांना मोकळेणाने बोलता तरी येतंय. अडीच वर्षं न बोलता तुम्ही काय काय केलंय हे सगळ्यांनी बघितलंय. मोदींच्या नावाने मतं मागितली, आणि विचारांशी गद्दारी करून सत्ता हापापली. भ्रष्टाचार केला. महाराष्ट्र रसातळाला नेला. महाराष्ट्रात जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार हे बघा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून एक आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.