लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : कर्नाटकातून सांगलीत विक्रीसाठी आयात केला जात असलेला ११ लाख ६० हजाराचा गुटखा म्हैसाळ सीमा नाक्यावर बुधवारी पकडण्यात आला. याप्रकरणी वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने सीमेवर स्थायी नाका कर्मचाऱ्यासह तैनात केला आहे.

आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक (एमएच १० सीआर ०६४१) राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरज कडे येत होती. यावेळी कर्नाटक बसच्या आडून हे वाहन पुढे नेण्याचा चालकाचा प्रयत्न होता. पोलीस नाईक प्रविण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना सुमारे ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा पोत्यात भरलेला आढळला. चालक सोहेल शेख ( वय २८ रा. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आणखी वाचा-सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी, सत्यजीत तांबेंचं भूमिकेला समर्थन; काँग्रेसला सल्ला देत म्हणाले, “अजूनही…”

पथकप्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, राकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते. वाहन, गुटखा, व मोबाईल असा १६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gutkha worth 11 lakh 60 thousand seized at maisal check post mrj
Show comments