प्रसिद्ध उद्योजक आनंद मंहिद्र यांच्याकडून दखल

सांगली : सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावातील एका अल्पशिक्षित, अपंग कारागिराने भंगारातील साहित्याचे जुगाड करून चारचाकी मोटार बनविली आहे. दुचाकीचे इंजिन वापरून तयार करण्यात आलेली ही मोटार ताशी ४० किलोमीटर गतीने धावते आहे. त्याच्या या प्रयोगशीलतेची दखल प्रसिद्ध वाहन उद्योजक आनंद र्मंहद्र यांनी घेतली असून त्यांनी या मोटारीच्या बदल्यात त्यांना बोलेरो ही अत्याधुनिक मोटार देऊ केली आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे आजोळ असलेल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांची ही यशोगाथा. लोहार हे एका हाताने अपंग असून अल्पशिक्षित आहेत. घरीच ते र्वेंल्डगचा व्यवसाय करतात. मुलींना शाळेला सोडण्यासाठी ते दुचाकीचा वापर करीत होते. मुलींने त्यांच्याकडे मोटारीची मागणी केली. यातून त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी भंगारातील साहित्य वापरून ही छोटीशी मोटार बनवली.

यासाठी त्यांनी दुचाकीच्या इंजिनचा वापर केला असून पुढील बाजूस रिक्षाची तर मागील बाजूस अन्य एका छोट्या दुचाकीची चाके बसवली आहेत. पुढील बाजूस चालकासह दोन आणि मागील बाजूस दोन अशा चार जणांची या मोटारीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोटारीचा ताशी कमाल वेग ४०  किलोमीटर आहे. तर एक लिटर पेट्रोलमध्ये ही मोटार ४० किलोमीटर धावू शकते. इंधनासाठी पाच लिटर क्षमतेची टाकीही बसविण्यात आली आहे. गंमत अशी,की ही मोटार दुचाकीपासून बनवलेली असल्याने ती चालू करण्यासाठी तशीच ‘किक’ची रचना ठेवलेली आहे. चालकाच्या बाजूला असलेल्या ‘किक’ने ही मोटार सुरू होते.

लोहार यांच्या कामगिरीची दखल राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही घेतली. त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक करत या मोटारीची निर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात आलेले ५० ते ६० हजार रुपये विश्वस्त निधीतून लोहार यांना देण्यात येतील असे कदम यांनी सांगितले.

आनंद मंहिद्र यांच्याकडून कौतुक

दत्तात्रय लोहार यांचा वाहन विश्वातील हा प्रयोग ‘समाज माध्यमा’तून वाहन उद्योजक आनंद र्मंहद्र यांच्यापर्यत पोहोचला. त्यांनीही लगोलग या प्रयोगशीलतेची दखल घेत ही मोटार त्यांच्या संग्रहालयात ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. ही मोटार वाहन कायद्याप्रमाणे रस्त्यावर चालवता येणे शक्य नसल्याने आपण या प्रयोगाचा आदर करत तिचा सांभाळ करू आणि त्याबदल्यात लोहार यांना त्यांच्या कंपनीची बोलेरो ही अत्याधुनिक मोटार देऊ, असे आश्वासन  आनंद र्मंहद्र यांनी दिले आहे.