आमचे विद्वान मित्र नाना पटोले म्हणाले अजित पवार बिभीषण आहेत. मला इतका आनंद झाला की काय सांगू. आता अजित पवार जर बिभीषण असतील आणि ते आपल्याकडे असतील तर आपण कोण? आणि ते ज्यांच्याकडून ते आले ते कोण? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवरही फडणवीस यांनी टीका केली आहे. आता हे दाखले आहेत, मी काहीही म्हणत नाही. मी फक्त उदाहरणं देतोय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंची फिरकी घेतली.

उद्धव ठाकरे मला कलंक म्हणाले पण..

मला हेच कळत नाही की उद्धव ठाकरे असं का बोलत आहेत. मी त्यावर काहीच का बोललो नाही. अशा परिस्थिती त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. मानसिक म्हणजे ते आहेत व्यवस्थित पण अशा परिस्थितीत कधी कधी दडपण येतं. आपला आपल्यावर ताबा राहात नाही, कधी कधी विवेक राहात नाही त्यातून अशी वक्तव्य होतात. त्यामुळे ते कलंक म्हणाले तर आमचे लोक म्हणाले कलंक नाही कलाकंद आहेत. जाऊ द्या..

What Modi Said About Uddhav Thackeray ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
Narendra Modi reuters
“ते कर्ज मी कधीच विसरू शकत नाही”, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत नरेंद्र मोदींचं वक्तव्य
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
What jitendra awhad Said?
“अजित पवार अप्रत्यक्षपणे हेच सांगत आहेत की ते स्वार्थी…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
rohit pawar on devendra fadnavis god gift statement
“देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात, तो आशीर्वाद नसून…” रोहित पवारांची खोचक टीका!
Pune Lok Sabha, Ravindra Dhangekar,
पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर
Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”

बिभीषण प्रभूरामाकडे आला तेव्हा काय घडलं?

बिभीषण जेव्हा श्रीरामाकडे आले तेव्हा वानरसेना म्हणाली की त्यांना का घेता? महावीर हनुमान आपल्याकडे आहे. महाराज सुग्रीव आहेत, शिष्टाईत निष्णात असेलला अंगद आहे. जांबुवंतांसारखा बुद्धिमान आपल्याकडे आहे, लक्ष्मणासारखा वीर आहे. त्यावेळी प्रभू श्रीराम म्हणाले की बिभीषण आपल्या बरोबर आल्याने रावण मनातून पराभूत झाला आहे. जो नेता मनातून पराभूत होतो तो विजय मिळवू शकत नाही. कोण मनातून पराभूत झालंय मी बोलत नाही मी फक्त दाखले देतो आहे.

हे पण वाचा- “काही लोक पोहरादेवीची खोटी शपथ घेऊन…”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; २०१९ ला काय घडलं ते पुन्हा सांगितलं

मी संजय राऊत नाही

माझी मीडियालाही विनंती आहे मी कुणालाही रावण, राम, बिभीषण म्हणत नाही. मी संजय राऊत नाही हे लक्षात ठेवा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज देऊ शकत नाही. जशी २०१९ ची उत्तरं २०२३ ला मिळाली तशी आत्ताची उत्तरं २०२६ पर्यंत नक्की मिळतील. फक्त एकच सांगतो, हम छेडते नहीं और छेडा तो छोडते नहीं. शिवरायांनी सांगितलं आहे दगाबाजांना माफी नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने एकच गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की महाविजय २०२४ हे जे अभियान आपल्या हाती घेतलं आहे पण बावनकुळेंना मी इतकंच सांगतोय आपल्याला १५२+ जागा आणायच्या आहेत.

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून जागांचं वाटप व्यवस्थित करु. बावनकुळेंना हे नक्की सांगतो की तुमच्या मनातला १५२ चा आकडा नक्की पूर्ण करता येईल हे लक्षात घ्या असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्याला २८८ मतदारसंघात काम करायचं आहे. आपल्यालाही निवडून यायचं आहे आणि आपल्या मित्रांनाही निवडून आणायचं आहे. भाजपा बेईमान नाही, जे आपल्या बरोबर आले आहेत त्यांना सांभाळण्याची क्षमता आपल्यात आहे आणि आपण त्यांना सांभळणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ज्या ‘कलंक’ शब्दामुळे वाद रंगला आहे त्या शब्दाचा नेमका अर्थ काय?

उद्धव ठाकरे जेव्हा युतीत सडलो सांगत होते…

अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की २०१७ मध्ये जेव्हा काँग्रेस व्यतिरिक्तचे पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येण्याचा प्रयत्न झाला होता. उद्धव ठाकरे आम्ही युतीत सडलो सांगत होते त्याही वेळी आपल्या नेत्यांनी सांगितलं राष्ट्रवादीला की आपण एकत्र येऊ पण आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. त्यामुळे ठरलेल्या गोष्टी फिस्कटल्या होत्या. आता आपण सगळ्यांना बरोबर घेतलं आणि तसंच आपल्याला पुढे जायचं आहे. एक वर्षात आपण किती वेगवेगळे निर्णय घेतले. नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांसाठी योजना, दमणगंगा पिंजाळ योजना, नळगंगा वैनगंगा योजना, तापीची योजना अशा अनेक योजना आणल्या आहेत. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. कुलुपबंद सरकारने या अनेक प्रकल्पांना कुलुप लावलं होतं पण आपण ते काम पुन्हा सुरु केलं आहे. सामान्य माणसाच्या हितासाठी आपण हजारो निर्णय घेत आहोत. मागच्याही काळात सांगितलं की जे १० ते ११ महिने आपल्या हातात आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मोदींच्या हाती पुन्हा एकदा भारत दिला की देशाला मागे वळून पहावं लागणार नाही. २०२४ चं रॉकेट आपल्या भारत नावाच्या मिसाईलला लावलं की कुणीही आपल्याला थांबवू शकत नाही. जगातल्या अनेक देशांना हे माहित आहे. त्यामुळेच षडयंत्रही सुरु झाली आहे. भारतविरोधी शक्ती मजबूत करण्याचा प्रय़त्न सुरु झाला आहे. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रय़त्न केला जातो आहे असाही आरोप फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांना विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या खोलात गेलं की सगळे एकच निघतात. आरे, बारसू, नाणार, वाढवण यांना विरोध करणारे तेच लोक आहेत. यातले काहीजण खरेही असतील.. पण जो संघटित विरोध होतोय त्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळलं आहे की अनेक शक्तींना हवं आहे हे प्रकल्प लांबले पाहिजेत असंही फडणवीस म्हणाले आहेत. सामान्य माणूस आणि गरिबांचा विश्वास मोदींवर आहे. तो विश्वास आपली शिदोरी आहे हे लक्षात ठेवा असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोदींसारखा नेता उभा असेल तरच अशी आंतरराष्ट्रीय षडयंत्रं रोखली जाऊ शकतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.