These 5 players changed the fortunes of RCB : आरसीबीने आयपीएल २०२४ च्या प्लेऑफ्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शनिवार रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नॉकआउट सामन्यात आरसीबीने सीएसकेचा २७ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे सलग सहा सामन्यात विजय मिळवून आरसीबीने प्लेऑफ्समध्ये धडक मारली आहे. आता, २२ मे (बुधवार) रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा सामना पॉइंट टेबलमधील तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी (हैदराबाद किंवा राजस्थान) होईल. तत्पूर्वा आयरसीबीला प्लेऑफ्समध्ये पोहोचवण्यासाठी कोणत्या पाच खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली जाणून घेऊया.

विराट कोहली: विराट कोहलीने आरसीबीसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या हंगामात कोहली आरसीबीचा स्टार परफॉर्मर ठरला आहे. कोहलीने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ७०८ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक-रेट १५५.६० आणि सरासरी ६४.३६ राहिला आहे. कोहलीने चालू हंगामात पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. सध्या ऑरेंज कॅप फक्त किंग कोहलीकडे आहे.

RCB vs RR Rain Abandoned Match Who Will Play Qualifier 2
RCB vs RR एलिमिनेटर सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोणाला मिळणार क्वालिफायरची संधी? काय आहे IPL चा नियम?
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

कॅमेरून ग्रीन: या हंगामात, आरसीबीने कॅमेरूनला ट्रेडिंग विंडोद्वारे आपल्या संघात समाविष्ट केले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ग्रीन फ्लॉप ठरला होता, पण त्यानंतर त्याला सूर गवसला आहे. ग्रीन बॅटिंगने वादळ निर्माण करत असतानाच गोलंदाजीतही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ग्रीनने १२ सामन्यात २२२ धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर ग्रीनच्या नावावर ९ विकेट आहेत.

हेही वाचा – “धोनीचा ‘तो’ षटकार आमच्या पथ्यावर पडला, ज्यामुळे प्लेऑप्समध्ये पोहोचू शकलो…”; आरसीबीच्या दिनेश कार्तिकचे वक्तव्य

विल जॅक्स : विल जॅक्सने आरसीबीचे नशीब पालटण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जॅकला संधी मिळाली नाही. मात्र संधी मिळाल्यावर त्याने अतुलनीय कामगिरी केली. जॅकने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले, ज्यामुळे या स्पर्धेत आरसीबीला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर जॅकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४१ धावांची खेळीही खेळली.

यश दयाल: डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने आरसीबीसाठी या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. दयालने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १३ सामन्यांत ८.९४ च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या आहेत. सीएसके विरुद्धच्या सामन्यातील शेवटचे षटक यश दयालने टाकले होते, ज्यामध्ये त्याने महेंद्रसिंग धोनीला बाद करत आरसीबीला विजयी केले.

हेही वाचा – IPL 2024 : RCB ने प्लेऑफ्ससाठी पात्र ठरून रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

रजत पाटीदार : खरेतर, रजत पाटीदार हा आरसीबीचा एकमेव खेळाडू ठरला आहे, ज्याच्या बॅटने २१ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत तीन अर्धशतके झळकावली आहेत. ही अर्धशतके पाटीदारने या हंगामात झळकावली आहेत. पाटीदारने हैदराबादविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर या खेळाडूने केकेआरविरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक केले. त्यानंतर पंजाबविरुद्धही रजतने २१ चेंडूंत अर्धशतक ठोकले आहे