तुम्हाला नवीन पोलीस ठाणे हवे असेल तर गुन्ह्यांचे प्रमाण (क्राईम रेट) वाढवा, अशी मुक्ताफळे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी उधळली आहे. अहमदनगरमधील पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. अहमदनगरमध्ये सध्या पाच नवी पोलीस ठाणी उभारण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. कमी क्राईम रेट असल्यास पोलीस ठाणे मिळत नाही, हे मला गृहराज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात समजले आहे. त्यामुळे नवे पोलीस ठाणे हवे असल्यास तुम्ही गुन्ह्यांचे प्रमाण वाढवा, असा सल्ला राम शिंदे यांनी दिली.