Petrol-Diesel Price in Maharashtra: आज मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. ; ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा तर काहींच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नाशिक, परभणी या शहरांत पेट्रोलचा भाव वाढल्याचे दिसून आले आहे. तर बुलढाणा शहरात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बुलढाण्यात पेट्रोल स्वस्त झाल्याचे चित्र दिसते आहे. २५ मे २०२४ रोजी बुलढाण्यात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०६.०२ रुपये होती. तर आजच्या तारखेला पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०४.७३ रुपये आहे.तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे एकदा तपासून घ्या.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८८९१.३९
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१०९१.६०
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०४.४५९०.९८
गडचिरोली१०५.१६९१.६९
गोंदिया१०५.५९९२.०९
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.६५९२.१३
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९८९०.५४
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१७९१.६७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०३.६९९०.४१
रायगड१०३.७८९०.२९
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४२९०.४७
सातारा१०५.०७९१.५६
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०५.७०९२.२०

महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत असते. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील अहमदनगर, यवतमाळ, सिंधुदुर्ग या शहरांत डिझेलची दरवाढ पाहायला मिळाली आहे. अहमदनगरमध्ये डिझेलची किंमत आज ९१.३९ रुपये प्रति लिटर , यवतमाळमध्ये ९२.२० रुपये प्रति लिटर तर सिंधुदुर्ग या शहरांत ९२.४१ रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या तिन्ही शहरातील नागरिकांना दरवाढीचा फटका बसू शकतो असे चित्र दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest petrol diesel price in maharashtra 27th may 2024 fuel rates in marathi check your city rates given below asp
First published on: 27-05-2024 at 10:52 IST