विश्वास पवार वाई:
राजकीय दबावामुळे सातारा सिंचन विभागाचे नियोजन फसल्याने उत्तर साताऱ्यातील वाई, भोर,खंडाळा, फलटण तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . चार टीएमसीच्या या धरणात फक्त  २२  टक्के मृत पाणी साठा शिल्लक आहे..या धरणाच्या उभारणीत  त्यागाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम भागातील लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर साताऱ्यातील वाई, भोर,खंडाळा, फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बलकवडी धरणात २२  टक्के पाणी साठा शिल्लक आहे. याची झळ वाई तालुक्यासह इतरही तालुक्यांना बसणार आहे.

हेही वाचा >>> ‘मी आधी राजीनामा दिला, मग हकालपट्टी झाली’, संजय निरुपमांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले…

बलकवडी धरणातून वाई, भोर,खंडाळा, फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात येतो. भोर खंडाळा फलटण बरोबरच वाई तालुक्याला जललक्ष्मी योजनेद्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्यात येतो.  यामुळे धरण असणाऱ्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर येथे साताऱ्यातील सर्वाधिक पाऊस होतो. राजकीय दबावामुळे कालव्याद्वारे पाणी सोडल्याने सिंचन विभागाचे नियोजन फसले असून  पाणी पातळी खालावली. चार टीएमसी च्या या धरणातील पाणी कृष्णा नदी द्वारे धोम धरणात व दोन धरणातून आसरे बोगद्यातून भोर खंडाळा फलटण तालुक्याला कालव्याद्वारे पोहोचविले जाते.

हेही वाचा >>> “४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

पुढील दुष्काळाचा अंदाज न घेता लोकसभा निवडणुकीत लोकांना खुश करण्यासाठी राजकीय दबाव वापरून या धरणातील पाणी फलटण तालुक्याला सोडण्यात आले. आता धरणात फक्त मृत पाण्याचा साठा शिल्लक राहिल्याने पश्चिम भागात व तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणात पाणी शिल्लक नसल्याने पाण्याची भीषणता उन्हाळ्यात जाणवणार आहे.पाणी पातळी खालावल्याने  जुन्या खुणा उघड्या पडल्या आहेत. वाई तालुक्याच्या सिंचनाकडे बलकवडी पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वाई तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण सध्या पूर्ण रिकामे होवून त्यागाची भूमिका घेणाऱ्या भागातच ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. सिंचन विभागाच्या निष्काळजी पणाचा फटका येथील लोकांना बसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.