Maharashtra SSC Result 2019 : यंदा गेल्या वर्षीपेक्षा बारावीचा निकाल दोन दिवस आधी म्हणजे २८ मे रोजी लागला. सध्या जे सूत्रांकडून संकेत मिळतायत ते बघता यंदा दहावीचा निकालही गेल्या वर्षीपेक्षा काही दिवस आधी लागण्याची शक्यता दिसत आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार आठवडाभरात दहावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी आठ जून रोजी दहावीचा निकाल लागला होता. यंदाही याच तारखेच्या आसपास कदाचित एखाद दोन दिवस आधीच दहावीचा निकाल लागेल का याकडे विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागलेले आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल लवकरच लागणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार दहावीचा निकाल दहा जूनच्या आत लागणार असल्याचे समजतेय. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरीत्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता. त्यामुळे यंदाही दहावीच्या निकालची तिच तारीख निवडली जाऊ शकते आणि कदाचित बारावीचा निकाल जसा दोन दिवस आधी लागला तसाच दहावीचा निकालही आधी लागू शकतो. www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर होऊ शकते.

येथे पाहू शकाल निकाल –
maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.

असा पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.