मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. आज ( २९ ऑक्टोबर ) जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे-पाटलांनी उपचारास नकार दिला आहे. त्यामुळे उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे-पाटलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील यांचा हात थरथर कापत होता. ते नेहमीप्रमाणे बोलू शकत नव्हते. “सरकारचं कुठंलही उत्तर नाही अथवा संवाद नाही. ३०-३१ ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
पंकजा मुंडेंच्या नाशिकबाबतच्या विधानावरुन छगन भुजबळांचा सल्ला; म्हणाले, “बीडकडे लक्ष द्या..”
वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई

हेही वाचा : “शिंदेंचं मुख्यमंत्रीपद टिकवायला तोडगा, पण…”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका

‘दोन दिवसांत आरक्षण मिळण्याची शक्यता आहे’ असं विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलं आहे. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “दोन दिवसांत आरक्षण मिळेल, असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का सांगत नाहीत?”

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा, छत्री उगवावी तसं…”, ‘त्या’ आरोपाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

‘माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होऊ शकत नाही’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर जरांगे-पाटलांनी सांगितलं, “चर्चेला यावं, मराठे कुठेही आडवणार नाहीत. मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही. फक्त एकदाच चर्चेला येणार की नाही, हे सांगा. बाकीची वळवळ करायची नाही,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.