scorecardresearch

Premium

“मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं अशक्य”, महाजनांच्या वक्तव्यावर जरांगे-पाटील इशारा देत म्हणाले…

गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

girish mahajan manoj jarange patil
मनोज जरांगे-पाटलांनी आमरण उपोषणाबाबत केलेल्या घोषणेवर गिरीश महाजनांनी भाष्य केलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं आहे. पण, सरकारनं दिलेल्या आश्वासानंतर जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. तर, या वक्तव्यानंतर जरांगे-पाटील यांनी महाजनांना सूचक इशारा दिला आहे.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मी जरांगे-पाटील यांची चारवेळा भेट घेतली, तेव्हाही सांगितलंय की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्य नाही. कुणबी दाखले सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. पण, मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार? हा प्रश्न आहे. न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनीही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे,” असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.

What Jitendra Awhad Said?
“…तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील”, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
lalit kala kendra ram leela pune marathi news, pune ram leela controversy marathi news
पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?
Chhagan-Bhujbal-1
“सर्व नाभिक आणि मराठा समाजाला…”, ‘त्या’ वक्तव्यावरून छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

“महाजनांनी मराठा समाजाला नडू नये”

यावर जरांगे-पाटलांनी म्हटलं, “गिरीश महाजन यांनी विचार करावा. कारण, मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी आम्ही गिरीश महाजनांना ४ दिवसांचा वेळ दिला होता. पण, ‘हा वेळ पुरेसा नसून १ महिन्यांची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो,’ असं महाजनांनी सांगितलं. आता महाजनांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये.”

“महाजनांनी फडणवीसांचं नाव खराब करू नये”

“गिरीश महाजनांच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. माध्यमांचे व्हिडीओही आहेत. पूर्ण राज्यात ते व्हायरल करू. ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांनी भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये. आमचा महाजनांवर विश्वास असल्यानं तीनवेळा व्यासपीठावर मानसन्मान दिला आहे. आता, महाजनांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब करू नये,” असेही जरांगे-पाटलांनी खडसावलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manoj jarange patil slams girish mahajan maratha reservation ssa

First published on: 04-12-2023 at 14:38 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×