ओबामांच्या दौऱयाच्या निषेधार्थ नक्षल्यांची ‘भारत बंद’ची घोषणा

प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा राजपथावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निषेधार्थ २६ जानेवारीला ‘भारत बंद’ची घोषणा नक्षलवाद्यांनी केली आहे.

प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा राजपथावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निषेधार्थ २६ जानेवारीला ‘भारत बंद’ची घोषणा नक्षलवाद्यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱया कमलापूर गावामध्ये नक्षलवाद्यांनी ‘भारत बंद’चे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. गावातील मुख्य चौकातही हे बॅनर लावण्यात आले आहेत. ओबामा यांच्या भारत दौऱयाचा निषेधासाठी नक्षलवाद्यांकडून ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. या घोषणेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.
ओबामा येत्या २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीमध्ये येत आहेत. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱया संचलनामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच राजपथावर होणाऱया संचलनासाठी येणार आहेत. ओबामा यांच्या दौऱयामुळे दिल्लीतील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ओबामा आग्रामध्ये ताजमहालालाही भेट देणार आहेत. त्यामुळे तेथेही कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maoist called for bharat band on republic day

ताज्या बातम्या