मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे विविध योजनांच्या उद्घाटनानंतर गुलाबराव पाटील बोलत होते. एकूण ४० आमदार फुटले. त्यात ३३ नंबरला मी गेलो, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

“नागपूरपासून दादरपर्यंत सर्व आमदार गेले. मी एकटाच राहिलो असतो. मग, विकास करू शकलो असतो का? पण, उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात होते. त्यांना विनंती केली, हात जोडले, पाया पडलो,” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
sharad Pawar
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका, “सत्तेचा उन्माद..”
dekhi cabinet minister raajkumar anand
‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…

हेही वाचा : ‘त्या’ वक्तव्यावरून आसाममधील विधानसभेत बच्चू कडूंच्या अटकेची मागणी, ते म्हणाले, “मला वाटलं…”

“आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचं तर जाऊदे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं.

हेही वाचा : “महाराष्ट्रातल्या कुत्र्यांना…” बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत गोंधळ, अटकेची मागणी

“सात महिन्यांत एकनाथ शिंदे पाचवेळा जळगाव जिल्ह्यात आले आहेत. असा मुख्यमंत्री कोठेही सापडणार नाही. परंतु, आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो, तर चांगला होते. आता एकदम बिघडून गेलो. पश्चिम बंगालमध्ये सापडलेले २७ कोटी सापडले होते. ते आणण्याासठी एक ट्रक लागला. मग, ५० कोटी आणायला दोन ट्रक लागले असते ना,” असा सवाल खोक्यांच्या आरोपांवरून गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.