नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीतील यशावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक लोक आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही निवडून आल्याचं बोलत असल्याचं सांगितलं. तसेच “माझा यशाचा एकच बाप आहे,” असं मत व्यक्त केलं. ते निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच चोपडा तालुक्यात आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयात पदवीधर शिक्षकांची भेट घेतली.

सत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक लोकं येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे.हे मी सभागृहातही मांडलं.”

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”

“माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो…”

“इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स’. यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं.

“…त्यामुळे मी निवडून आलो”

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “त्यांनी मागील १४-१५ वर्षात प्रत्येकाशी जे संबंध निर्माण केले त्यामुळे मी निवडून आलो. त्यांनी कधीच कुणाची जात पाहिली नाही किंवा धर्म पाहिला नाही, कुणाचा पक्ष पाहिला नाही. त्यांनी प्रत्येकाशी संबंध ठेवले म्हणून सर्वजण माझे पाठीशी उभे राहिलं. याची मला जाणीव आहे.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : VIDEO: भाजपा खासदार सुजय विखेंना भेटणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “मी त्यांना संपर्क केला होता, ते…”

“”बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा मोठा इतिहास”

“बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे,” असं सूचक वक्तव्य सत्यजीत तांबेंनी केलं.