Lok Sabha Election 2024, Raj Thackeray Meet Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडते आहे. याचं कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ताज लँड्स या हॉटेलवर पोहचले आहेत. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात रात्री उशिरा एक बैठक झाली. त्यापाठोपाठ आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. यामुळे महायुतीत चौथा भिडू येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अमित शाह आणि राज ठाकरे भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र अमित ठाकरे होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घेतलेली ही भेट महत्वाची मानली जाते आहे. अशात आता राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली ही भेट सूचक मानली जाते आहे. राज ठाकरे जर महायुतीत आले तर महायुतीची ताकद नक्की वाढणार आहे यात काही शंका नाही.

UP & Hariyana CM To Be Changed Viral Claim
यूपीचे मुख्यमंत्री बदलणार? योगी आदित्यनाथ यांच्या बदलीसाठी भाजपाच्या प्रसिद्ध नेत्याचं पत्र व्हायरल; कुणाची झाली शिफारस?
Eknath shinde and nitish kumar
“४०० पारच्या घोषणेमुळे गडबड झाली”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर जदयू नेते म्हणाले, “निवडणुकीत…”
Chief Minister Eknath Shinde candid speech Shrikant Shinde is responsible for party organization
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती; श्रीकांत शिंदेंकडे पक्ष संघटनेची जबाबदारी
Dr Srikant Shinde as group leader of Shiv Sena
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी
What CM Eknath Shinde Said About Devendra Fadnavis?
देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Anil Parab On Ashish Shelar Eknath Shinde Uddhav Thackeray
“आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वाद”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा
CM Eknath Shinde To Uddhav Thackeray
“तोंडावर कधीच आपटलेत, आता त्यांची तोंड फुटतील”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
dcm ajit pawar not reachable since after baramati constituency polling
अजित पवार कुठे आहेत?

मनसेसाठी आजची भेट महत्वाची

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सहभागी झाली तर मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणी जागा दिली जाईल अशी चर्चा आहे. या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेली चर्चाही गुलदस्त्यातच आहे.राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांना लोकसभेच्या जागा दिल्या जातील की विधानसभेसाठी त्यांना जागा सोडल्या जातील हे स्पष्ट झालेलं नाही.

छगन भुजबळ यांनी काय म्हटलं होतं?

“राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे.” असं भुजबळ यांनी म्हटलं होतं.

हे पण वाचा फडणवीसांनी मध्यरात्री घेतली राज ठाकरेंची भेट, काय चर्चा झाली? उपमुख्यमंत्री म्हणाले…

अतुल भातखळकर काय म्हणाले होते?

“राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजपाच्या नेतृत्वात कार्यरत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवण्याला जे समर्थन देतात त्यांचं आम्ही महाराष्ट्रात, महायुतीत स्वागत करु. राज ठाकरेंनी तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने ठरवलं आहे की ४५ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आणि देशात ४०० पार हे भाजपा आणि रालोआला मिळणार आहेत. राज ठाकरे महायुतीत आले तर त्याचा फायदा आगामी राजकारणात नक्की होईल.”

महायुतीत चौथा भिडू?

महाराष्ट्रात जेव्हा शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं त्यानंतर म्हणजेच जून २०२२ नंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे यांच्यातली जवळीक वाढलेली पाहण्यास मिळाली. या तिघांनी २०२२ ला दिवाळी महोत्सवातही एकत्र उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतरही ते एकमेकांना अनेकदा भेटले. उद्धव ठाकरेंसह असताना आम्ही राज ठाकरेंना भेटू शकत नव्हतो हे तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं. या भेटीगाठी वाढल्यापासूनच राज ठाकरे महायुतीत येतील का? या चर्चा रंगल्या होत्या. असं घडलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करु असं वारंवार भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. आता महायुतीत चौथा भिडू राज ठाकरेंच्या रुपाने येणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.